fbpx

The VFX Institute

आमची संस्था तुमचा आदर्श पर्याय आहे

दि व्हीएफएक्स इन्स्टिट्यूटमध्ये आमचे स्वप्न व्हिज्युअल इफेक्टच्या क्षेत्रात अद्वितीय शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचे आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कलात्मकतेच्या आणि तांत्रिक नावीन्यपूर्णतेच्या सर्व सीमारेषा पार करण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर त्यांना वेगाने बदलत्या व्हीएफएक्स उद्योगात आपल्या यशस्वी करियरसाठी तयारही करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

आम्ही हे उद्योगाशी सुसंगत अभ्यासक्रम देऊन साध्य करण्याचा हेतू ठेवतो. त्यातून प्रत्यक्ष शिक्षण, सहयोग आणि समस्या सोडवण्यावर भर दिला जातो. आमच्या अद्ययावत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान यांच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचा सर्वांगीण अभ्यासक्रम देण्यास मदत मिळते ज्यात कलात्मकता, तांत्रिक कौशल्ये आण व्यावसायिक दृष्टीकोन या सर्वांचा समावेश आहे.

आम्ही वैविध्यपूर्णता, समानता आणि समावेशाच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. इथे सर्व प्रकारच्या पार्श्वभूमी असलेल्या आणि ओळख असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. आमचे कटिबद्ध शिक्षकवर्ग आणि कर्मचारी त्यांच्या कामाप्रति उत्साही आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

As a result of our unwavering dedication to excellence

सर्वोत्तमतेला आमच्या संस्थेत सर्वोच्च स्थान दिले जात असल्यामुळे आमच्या प्रमाणित विद्यार्थ्यांना व्हीएफएक्स उद्योगात अर्थपूर्ण आणि योगदान देण्यासाठी व जगावर एक सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान यांनी समृद्ध केले जाईल.

प्रत्यक्ष अध्ययन, खऱ्या जगातील प्रभाव

व्हीएफएक्स इन्स्टिट्यूटमधील शिक्षण फक्त पुस्तकी नाही. उद्योगाच्या केंद्रस्थानी नेणारा हा तुमचा प्रत्यक्ष प्रवास आहे. तो तुम्हाला न्यूक, सिलहॉट, मोका आणि इतर अशा विविध शक्तिशाली टूल्सचा वापर करायला शिकवतो. आम्ही तुम्हाला कथांमध्ये जीव ओतणारी दृश्ये तयार करण्यासाठी सक्षम करतो. त्यामुळे तुमचे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील आणि तुम्ही मनोरंजनाच्या भवितव्याला आकार देऊ शकाल.

सीमारेषा नाहीत, फक्त शक्यता आहेत

आम्ही कलात्मकतेच्या विशाल सागरात स्वतःचे पाय रोवू इच्छिणाऱ्यांसाठी, आपला ठसा उमटवण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्यांसाठी, तुमच्या कल्पनाशक्तीला एक आयाम देण्यासाठी एक दिशादर्शक आहोत. फक्त मूलभूत संगणकीय ज्ञान असल्यास तुम्ही आमच्यासोबत शक्यतांचे संपूर्ण जग उलगडू शकता. आमच्या संस्थेत वय हा अडथळा नाही. आम्ही सर्व वयोगटातील अध्ययन वातावरणात व्हीएफएक्सचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी उत्सुक असलेल्यांना सक्षम करण्यावर भर देतो.

तुमच्यातल्या व्हीएफएक्स कलाकाराला जागृत करा

तुम्ही कधी एखादा चित्रपट किंवा गेमच्या अविश्वसनीय दृश्यांमध्ये हरवून गेला आहात, कधी सत्य आणि फँटसी यांची सरमिसळ पाहून थक्क झाला आहात का? हीच व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स)ची मंत्रमुग्ध करणारी शक्ती आहे. व्हिज्युअल बर्ड्स स्टुडिओने ऊर्जा मिळालेल्या व्हीएफएक्स इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही तुम्हाला या जादुई नगरीत रमून जाण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही तुमच्यासाठी एक खास ६-८ महिन्यांचा अभ्यासक्रम आणत आहोत. तो व्हीएफएक्सच्या जगातले तुमचे तिकीट आहे. हा अभ्यासक्रम नेहमीच्या शुल्कापेक्षा एक पंचमांश शुल्कात शिकवला जाईल.

आमची संस्था तुमचा आदर्श पर्याय आहे

निश्चित नोकरीची हमी
प्रत्यक्ष प्रशिक्षण
३६०- अंशांत प्रशिक्षण
स्टुडिओ इंटर्नशिप
नियमित स्टुडिओ भेटी
उद्योगातील तज्ञांकडून भाषणे
खिशाला परवडणारा अभ्यासक्रम
Industry expertise
उद्योगातील ज्ञान
अमर्याद सराव तास
कायमस्वरूपी करियरसाठी मदत